मोहुर्ली येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

जिला परिषद शाळेच्या पटांगणाच्या मागील घटना

0 11

 जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील मोहूर्ली येथील 43 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी 8.30 वाजता उघडकीस आली. राजेंद्र भवानी मेश्राम रा. मोहूर्ली, ता. वणी असे मृतकाचे नाव आहे. याबाबत संतोष नत्थुजी पेंदोर रा. मोहूर्ली यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी संतोष पेंदोर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याचे भाऊजी राजेंद्र मेश्राम यांनी आज सकाळी जिला परिषद शाळा पटांगणाचे मागे नाल्याजवळ आजन झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक राजेंद्र यास दारू पिण्याचे व्यसन होते.

फिर्याद वरून पोलिसांनी कलम 174 सीआरपीसी अनव्ये मर्ग दाखल केले आहे. पुढील तपास सपोनि संदीप एकाडे करीत आहे.

हेदेखील वाचा

नागपूर मेट्रो रेल्वेच्या ‘कुप्रसिद्ध’ पार्टीचेे वणी कनेक्शन

हेदेखील वाचा

मांडवी शिवारात वाघाचा मुक्तसंचार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.