जय महाकाली संघ ठरला WPL चा विजेता

टायगर रोअरिंग संघावर केली मात

10

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात पहिल्यांदाच IPL च्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या WPL वणी प्रेमियर लीग स्पर्धेत जय महाकाली संघ विजेता ठरला. शनिवार 18 डिसेंबर रोजी जय महाकाली विरुद्ध टायगर रोअरिंग यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात जय महाकाली संघाचा विजय झाला. विजेत्या संघाला 2 लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

11 डिसेंबर रोजी सुरू झालेल्या WPL स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होते. शनिवार 18 डिसेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना टायगर रोअरिंग प्रायोजक संभा वाघमारे विरुद्ध जय महाकाली प्रायोजक मातोश्री ट्रेडर्स यांच्यात खेळला गेला. नाणेफेक जिंकून जय महाकाली संघाने टायगर रोअरिंगला फलंदाजी दिली. प्रथम फलंदाजी करणा-या टायगर रोअरिंग संघाला 8 षटकात फक्त 45 धावा काढता आल्या.

46 धावांचा पाठलाग करताना जय महाकाली संघाने अवघ्या 4 षटक 4 चेंडूत हे टारगेट पूर्ण केले. विजेता संघाचा कर्णधार व संघ मालक सुधीर पेटकर यांच्या नेतृत्वाखाली जय महाकाली संघ विजेता ठरला. राहुल सिंगला सामनावीर घोषीत करण्यात आले. विजेता संघाला 2 लाख रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या संघाचे प्रायोजक मातोश्री ट्रेडर्सचे मालक महेश सोमलकर होते. उपविजेता टायगर रोअरिंग संघाला 1.50 लाखांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.  

हे देखील वाचा:

वेकोलि कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

चुना भट्टी कर्मचा-याचा आढळला मृतदेह

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.