आजारी शेळ्या सोडल्या कार्यालयात, वंचितचे अनोखे आंदोलन

पशू संवर्धन विभागातील रिक्त पद भरण्याबाबत वंचित आक्रमक

22

पुरुषोत्तम नवघरे, वणी: पशुसंवर्धन विभागात डॉक्टरांचे अनेक पद रिक्त असल्याने जनावरांना योग्य तो उपचार मिळत नाहीये. त्यामुळे वंचिततर्फे अनोखे आंदोलन करत चक्क पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाच्या आवारात आजारी शेळ्या सोडल्या. वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृ्त्वात हे आंदोलन करण्यात आले.

पशु संवर्धन विभागात अनेक पदे रिक्त असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व पशु पालकांच्या जनावरांना सुरळीत उपचार मिळत नाही. परिणामी जनावरांचा विविध आजाराने मृत्यू होत आहे. तालुक्यात श्रेणी १ ची पाच तर श्रेणी २ ची आठ रुग्णालये असून यातील श्रेणी २ ची पाच पदे रिक्त आहे तर श्रेणी २ ची चार पदे रिक्त असुन विस्तार अधिकारी देखील रिक्त आहे.

त्यामुळे अनेक रुग्णालयात प्रभारावर कारभार चालू असल्याने वेळेवर जनावरांना कोणताच उपचार मिळत नाही. त्यामुळे शेतकरी व पशु पालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीने सदर पदे भरून मुक्या जनावरांना सुरळीत सेवा पुरविण्याची मागणी केली होती.

परंतु शासनाच्या कोणत्याच हलचाली न झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे वणी वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी तालुक्यातील आजारी शेळ्या आणून चक्क पशु संवर्धन विभागात आणून सोडल्या व त्या शेळ्यांना आम्हला डॉक्टर द्या असे स्टिकर लावले होते. जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. क्रांती काटोले यांनी या आंदोलनाची दखल घेऊन शासनाकडे लवकरात लवकर सदर पदे भरण्यासाठी प्रस्ताव दाखल करू असे आश्वासन दिले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, शहराध्यक्ष किशोर मुन, युवा आघाडीचे अध्यक्ष विशाल कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव अर्चना कांबळे, जिल्हाउपाध्यक्षा वैशाली गायकवाड, जिल्हा संघटक ताई डोंगरे, तालुकाध्यक्षा शारदा मेश्राम, शराध्यक्षा अर्चना नगराळे, उपाध्यक्षा प्राणिता ठमके, अर्चना दुर्गे, सीद्धी करमनकर, अंजु पासवान, सुनीता दुपारे, कीर्ती लभाने, कपिल मेश्राम, सोनू दुर्गे, पिंटू डगावकर, चेतन रामटेके, अमोल दुपारे, अंकित पिदूरकर, आदी या आंदोलनात उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.