रस्त्याने जाणा-या महिलेचा विनयभंग

आरोपीला अटक, कारागृहात रवानगी

0 11

विवेक तोटेवार, वणी: राजूर येथील रहिवासी असलेल्या एका विवाहित महिलेचा 18 ऑक्टोबर रविवारी सायंकाळी 8.30 वाजताच्या सुमारास त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका इसमाने विनयभंग केला. पीडितेच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची रवानगी यवतमाळ येथील कारागृहात केल्याची महिती आहे.

पीडिता ही रविवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास जेवण केल्यानंतर आपल्या घराजवळ राहणाऱ्या भासऱ्याच्या घरी जात होती. यावेळी आरोपी प्रवीण भीमराव शिंदे (35) रा. कोच्ची ता. घाटंजी हल्ली मुक्काम राजूर कॉलरी याने दारूच्या नशेत तिचा रस्ता रोखला.

पीडितेचे केस व मान पकडून गाडीच्या हॅन्डलवर ठेवून तिचे कपडे फाडले. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्यांने पीडितेला लथाबुक्क्यांनी मारहाण सुद्धा केली. पीडितेने याबाबतची तक्रार वणी पोलिसात दिली.

पीडितेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपीविरुद्ध कलम 354, 354 (अ), 323 नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. व त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीची रवानगी यवतमाळ येथील कारागृहात केली आहे. सदर घटनेचा तपास डोमाजी भादीकर करीत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.