निर्गुडा नदीच्या पुलावरून एका इसमाने घेतली उडी

2 दिवस आधीच कारागृहातून झाली होती सुटका, शोध सुरू

10

विवेक तोटेवार, वणी: शहरातील मोक्षधाम जवळील पुलावरून एका इसमाने उडी मारली. फय्याज अली अजगर अली रा. मैल खड्डा (रंगनाथ नगर) असे उडी घेणा-या तरुणाचे नाव आहे. आज संध्याकाळी त्याचे कपडे आणि चप्पल निर्गुडा नदीच्या पुलावर आढळून आले. सध्या फय्याजचा शोध सुरू असून विशेष म्हणजे दोन दिवस अगोदरच त्याची कारागृहातून सुटका झाली होती.

फय्याज अली अजगर अली रा. मैल खड्डा (रंगनाथ नगर) हा इसम मोक्षधाम जवळील निर्गुडा नदीच्या पुलावर संध्याकाळच्या सुमारास आला. तिथून त्याने उडी घेतली. आज मंगळवारी शहरात मुसळधार पाऊस आल्याने नदीला पूर आला होता. सदर व्यक्तीचे कपडे व चप्पल पुलावर ठेऊन असल्याने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा असा अंदाज आहे.

एक दिवस अगोदरच त्याची कारागृहातून सुटका झाली असल्याची माहिती आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. फय्याज याचा शोध सुरू आहे.

हे देखील वाचा:

राज जयस्वालची न्यायालयीन कोठडीत रवानगी

वणीत पहाटेपासून पावसाचा कहर, शहरातील रस्ते पाण्याखाली

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.