शिरपूर-शिंदोला रस्त्यावरील ‘त्या’ खड्ड्याची झाली दुरूस्ती

वणी बहुगुणीच्या बातमीचा इम्पॅक्ट, प्रशासनानं घेतली दखल

0 616

विलास ताजने, शिंदोला: शिरपूर ते शिंदोला रस्त्यावरील पोल्ट्री फार्म लगत मोठा खड्डा अनेक दिवसांपासून पडलेला होता. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली होती. सदर खड्ड्याची डागडुजी करण्यासंदर्भात सचित्र बातमी वणीबहुगुणी न्युज पोर्टल मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. सदर बातमीची वणीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेत खड्ड्याची दुरुस्ती केली आहे.

(हे पण वाचा: अखेर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न मिटला, उपोषण मागे)

या खड्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात झाले होते. तसंच अपघाताची शक्यता बळावली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने बातमीची दखल घेत खड्ड्याची दुरुस्ती केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसंच बातमीबाबत वणी बहुगुणी या न्यूज पोर्टलचं आभार मानलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.