माथेफिरूने फोडल्या विठ्ठलवाडी येथील 3 कारच्या काचा

परिसरात सातत्याने वाहनांच्या काचा फोडण्याच्या घटना

13

विवेक तोटेवार, वणी: शनिवार 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विठ्ठलवाडी येथील घरासमोर ठेवलेल्या तीन वाहनांच्या काचा दगड मारून फोडण्यात आल्या. यात वाहनधारकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याआधीही प्रगती नगर व विठ्ठलवाडी परिसरात अज्ञात माथेफिरूद्वारा वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. सातत्याने अशा घडणा-या घटनांमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

विठ्ठलवाडी येथे राहणारे गजानन दादाजी दोडके (51) हे शिक्षक आहेत. यांच्या घरासमोर ठेवलेले टाटा पंच कंपनीचे वाहन क्रमांक MH 29 BV 3765 या गाडीची मागची काचा दगड मारून फोडण्यात आली. तर सत्यानंद दिलीप मुंडे (33) हे तलाठी या पदावर कार्यरत आहेत. यांच्या घरासमोर ठेवलेले सुझुकी ब्रेंझा या वाहनांची मागील काच फोडण्यात आली.

मातोश्री ट्रेडर्स चे संचालक महेश सोमलकर यांच्या मालकीचे हुंडाई कंपनीचे वाहन क्रमांक MH31 FA 3733 याची मागची काच दगड मारून फोडण्यात आली. सदर घटना या शनिवारच्या मध्यरात्री ते रविवारी पहाटेच्या सुमारास दरम्यान घडल्या. या अगोदरही अशीच घटना विठ्ठलवाडी व प्रगतीनगर येथे घडलेल्या आहेत. या घटनेची तक्रार वणी पोलिसात देण्यात आली आहे. कारचे नुकसान करणा-या माथेफिरूला अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

हे देखील वाचा:

पारंपरिक वाद्य, देखावे आणि भाविकांच्या जल्लोषात निघाली भव्य शोभायात्रा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.