युवासेनेची झरी तालुका कार्यकारिणी जाहीर

अनेक तरुणांचा शिवबंधन बांधून युवासेनेत प्रवेश

0 406

सुशील ओझा, झरी: शिवसेना प्रणीत युवासेनेची झरी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात नीलेश बेलकर यांची तालुका संघटक, गजानन बंदावाव यांची तालुक्या समन्वयक, महेश निखाडे यांची उप तालुका युवा अधिकारी, मनीष भोयर उपतालुका युवा अधिकारी तर प्रमोद गालेवार यांची तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात या नियुक्ती करण्यात आल्या.

याशिवाय चेतन भाशेट्टीवार यांना विभाग युवा अधिकारी, सूरज गेड्डमवार उप विभाग युवा अधिकारी, राहुल राजूरकर विद्यार्थी सेना तालुका अधिकारी, निखिल ठाकरे विद्यार्थी सेना उप तालुका युवा अधिकारी असा पदभार देण्यात आला. यावेळी अऩेक तरुणांनी शिवबंधन बांधून युवासेनेत प्रवेश केला.

नियुक्ती झालेल्या नवनिर्वाचित पदाधिका-यांना विश्वास नांदेकर, युवासेना विस्तारक दिलीप घुगे, युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा, शिवसेना तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी कुंदन टोंगे उप जिल्हा प्रमुख, सतीश वराते समन्वयक यवतमाळ जिल्हा व पवन राऊत तालुका प्रमुख यांची उपस्थित होती. युवासेना ही शिवसेनेची युथ विंग आहे. विद्यार्थी व तरुणाईच्या प्रश्नावर ही कार्यरत असून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात युवासेना कार्य करते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.