कुख्यात शेंबड्या गजाआड, चोरीच्या गुन्ह्यात होता वॉन्टेड

चोरीच्या दुचाकीसह जत्रा मैदान परिसरातून अटक

0 18

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात अनेक ठिकाणी घरफोडी व दुचाकी चोरी करणारा सराईत चोर शेंबड्याला वणी पोलिसांनी गुरुवारी 20 मे रोजी अटक केली. त्याची चौकशीत त्याने पाच गुन्हे केल्याचे उघडकीस आले. शेंबड्या कडून चोरीची एक दुचाकी व 7100 रुपये रोख जप्त करण्यात आले.

पोलिसांना खब-यां कडून जत्रा मैदान परिसरात रेकार्डवरील गुन्हेगार सतीश उर्फ शेम्बड्या बाबाराव मडावी (23) रा. दादाबादशाह नगर राळेगाव असल्याचे कळले. पोलीस तिथे गेले असता तिथे शेंबड्या हा एका मोपेड (MH29 AA 5396) सह उभा होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यांना सदर गाडी ही चोरीची असल्याचे कळले.

शेंबड्याची तपासणी केली असता त्याच्याकडे रोख 7 हजार 100 रुपये आढळून आले. रक्कमेबाबत विचारणा केल्यास आरोपीने वणी शहरातील दोन मेडिकल स्टोअर्स व पान सेंटर मध्ये रात्री चोरी केल्याचे कबूल केले. तर दुचाकी तालुक्यातील मजरा गावातून चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दुचाकी व रोख रक्कम असा एकूण 27 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरुद्ध पाचही गुन्ह्यात कलम 379, 380, 461, 457 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

सदर कारवाई उप वि.पो.अ. संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पो.नि. वैभव जाधव, पो.उप.नि. गोपाल जाधव, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दिपक वांडर्सवार यांनी केली.

हे देखील वाचा:

गाजावाजा करून सुरू केलेल्या विलगीकरण केंद्रात रुग्णच नाही

लॉकडाऊमध्ये मागल्या दारातून कपडे खरेदीची ‘सुविधा’ देणा-या दुकानावर धाड

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.