एकाच दिवसातल्या दोन आत्महत्यांनी हादरले मारेगाव

लहान पांढरकवड्यापाठोपाठ मारेगावातही आत्महत्या

1 17

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील प्रभाग क्र 13 मधील एका 43 वर्षीय विवाहीत इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शुक्रवारी 5.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. शंकर मडावी (43) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित इसमाचे नाव आहे.

शंकर यांच्या आत्महत्तेचे कारण कळू शकले नाही. मृतकाच्या त्याचे मागे पत्नी, 2 मुली, 1 मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यात सतत होत असलेल्या आत्महत्यांच्या घटनांमुळे आता तालुका हादरला आहे.

आज दिवसातील ही आत्महत्याची दुसरी घटना आहे. सकाळी पांढरकवडा (पिसगाव) येथे नितीन धानोरकर या विवाहीत इसमानेसुध्दा घरी गळफास लावून आत्महत्या केली. तर मारेगाव शहरातील शंकर मडावी यांनीसुद्धा घरीच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

हेदेखील वाचा

लहान पांढरकवडा येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

हेदेखील वाचा

आत्महत्या हा पहिला किंवा शेवटचाही मार्ग नाही…

Get real time updates directly on you device, subscribe now.

1 Comment
  1. […] एकाच दिवसातल्या दोन आत्महत्यांनी हाद… […]

Leave A Reply

Your email address will not be published.