राज्य राखीव पोलीस दलाच्या वाहनाला अपघात

२० जवान जखमी, तर २ गंभीर

0 853

जितेंद्र कोठारी, वणी : हिंगोली येथून गढचिरोली येथे बंदोबस्त करिता जात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या वाहनाला उमरखेड- पुसद मार्गावर उमरखेड ग्रामीण पोलीस ठाण्याचा हद्दीत सांडवा गावाजवळील उतारावर वाहनाचे ब्रेक फेल झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उलटून अपघात घडला.

अपघातात राज्य राखीव पोलीस दल, गट क्र. १२, हिंगोलीचे २० जवान जखमी झाले तर २ जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दुर्घटनेनंतर गावकर्यांनी जवानांना वाहनातून बाहेर काढण्यात मदत केली तसेच ताबडतोब १०८ क्र. अम्बुलंस बोलावून जखमी जवानांना उपचाराकरिता पुसद उप जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमीपैकी २ जवानाची परिस्तिथी गंभीर असल्यामुळे त्यांना पुसद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजू भुजबळ , ठाणेदार धनजंय सायरे, संजय चौबे, तसेच पुसद शहर, पुसद ग्रामीण व वसंतनगर पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी घटनास्थळी पोहचले व त्यांनी जखमी जवानांना मदत केली.

अपघातानंतर भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी ऑटोसेवा उपलब्ध करून जखमी जवानांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.