विहिरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

मार्डी येथील धक्कादायक घटना

0 12

नागेश रायपुरे, मारेगाव: एका 35 वर्षीय इसमाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही धकादायक घटना तालुक्यातील मार्डी येथे दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडली. सुनील गजानन मोहूर्ले (35) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नावं आहे.

प्राप्त माहिती नुसार सुनीलने मार्डी येथील बाजारवाडीतील घरा शेजारील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
वृत्त लिहेपर्यंत मृत्यूचे कारण कळू शकले नाही. तसेच मृतकाचे प्रेत वर आले नसल्याने विहिरीतून काढण्याची प्रक्रिया चालू होती. मृतक सुनीलच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील मोठा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

महिनाभरात आत्महत्येची दुसरी घटना –

शुभम भाजपाले या तरुणाने घरीच सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली होती. आज सुनील मोहूर्ले या विवाहित इसमाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.