शेलू येथील विवाहितेचा विनयभंग, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

अश्लील इशारे करून काढली महिलेची छेड

0 656
वणी: वणी तालुक्यातील शेलू येथील 23 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचं नाव धनराज महादेव ठेंगणे (37) असून त्यानं विवाहितेकडे पाहून अश्लील इशारे केले होते. तसंच तिला एक चिठ्ठी लिहून दिली होती.
बुधवारला सायंकाळी 6 साडेसहा वाजता सुमारास गावातील धनराज महादेव ठेंगणे यानं विवाहितेकडे बघून अश्लील इशारे केले. त्यामुळे विवाहिता घाबरली. तिचा पती शेतातून घरी आल्यानंतर तिनं घडलेला सर्व प्रकार तिच्या पतीला सांगितला. त्यानंतर तिच्या पतीनं धनराजला याबाबत विचारणा केली, मात्र धनराजनं सदर महिलेला व तिच्या पतीला अश्लील शिवीगाळ केली. तसंच दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार विवाहितेने पोलिसात दिली.

 

विवाहितेच्या तक्रारीवरून आरोपी धनराज ठेंगणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार घडल्यानंतर गावातील लोक पोलीस ठाण्यात आले होते. गुरुवारी धनराज ठेंगणेचा भाऊ व त्याची पत्नी सुद्धा पोलीस ठाण्यात आली. ठेंगणे व सातपुते यांनी घरावर चाल करून धक्काबुक्की केल्याची तक्रार त्यांनी दाखल केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.