धक्कादायक: जादूटोण्याच्या संशयावरून इसमाला मारहाण

केगाव येथील घटना, 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल

0 12

भास्कर राऊत, मारेगाव: मंदिरातील पूजा आटपून घरी परतणा-या एका इसमास जादूटोण्याच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली. तालुक्यातील केगाव येथे आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी गावातीलच एकाच कुटुंबातील 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जादूटोण्याच्या संशयावरून याआधीही धमक्या मिळाल्या आहे. मात्र तरीही पोलिसांनी थातुरमातूर कार्यवाही केली, असा आरोप फिर्यादीच्या मुलाने केला आहे.

सविस्तर वृत्त असे की फिर्यादी पांडुरंग महादेव पायघन (65) हे केगाव येथील रहिवाशी आहे. ते हनुमानाचे भक्त आहे. त्यांच्या घराजवळच हनुमानाचे मंदिर आहे. तिथे ते रोज सकाळी आंघोळीनंतर पूजा करण्यासाठी जातात. गावातच त्यांच्या शेजारी ठावरी कुटुंबीय राहते.

आज मंगळवारी दिनांक 20 जुलै रोजी पांडुरंग हे नेहमीप्रमाणे हनुमानाच्या मंदिरात पूजा करण्यासाठी गेले. पूजा आटपून परत येत असताना आरोपी आतिष गणपत ठावरी (27), शिला आतिष ठावरी (25) गीता गणपत ठावरी (50) हे पांडुरंग यांना आडवे झाले. माझ्या पत्नीवर जादू केली तिला ठिक कर असे म्हणत पांडुरंग यांना आतिषने धक्काबुक्की करत बेदम मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.

पीडित पांडुरंग महादेव पायघन यांनी तात्काळ मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी आतिष गणपत ठावरी (27), शिला आतिष ठावरी (25) गीता गणपत ठावरी (50) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपींवर भादंविच्या कलम 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार जगदिश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

हे देखील वाचा:

20 हजार रुपयांचे 2 लाख करून देण्याचे आमिष दाखवून शेतक-यांना गंडा?

राजूर (कॉ) मध्ये मध्यरात्री पुन्हा घरफोडी, शेजारी ओरडल्यानंतर चोर फरार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.