हृृदयविकाराच्या धक्क्याने तरुण व्यावसायिकाचे निधन

अतुल म्हात्रे हे शहरातील कॉम्प्युटर क्षेत्रातील परिचित नाव होते

12

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील आंबेडकर चौक येथील शांताई कॉम्प्युटर्सचे संचालक अतुल अनिल म्हात्रे (34) यांचे रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते छोरिया ले आऊट इथे त्यांच्या कुटुंबीयांसह राहायचे. काल मंगळवारी रांत्रीच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अतुल यांची एक होतकरू व सुस्वभावी तरुण म्हणून शहरात ओळख होती. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अतुल यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ व आईवडील असा आप्त परिवार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.