लालपुलिया कोळसा धाड प्रकरणी मुख्य आरोपीला पीसीआर

सहा आरोपींची कारागृहात रवानगी, दोघे फरार

0 15

जितेंद्र कोठारी, वणी: लालपुलिया कोळसा डेपो धाड प्रकरणी अटक सात आरोपीपैकी 6 आरोपींना वणी न्यायालयाने जिल्हा कारागृहात पाठविले आहे. तर मुख्य आरोपी अटलबिहारी गिरी यास 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणात एकूण 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले असून 2 आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार लाखांच्या कोळशासह सुमारे 34 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये मुख्य आरोपी कोळसा विक्री करणारा अटलबिहारी लोकेश्वरानंद गिरी (40) रा. मंगलम अपार्टमेंट वणी, कोळसा प्लॉट धारक इमरान कमरुद्दीन सैयद (42) उमंग अपार्टमेंट, साधनकरवाडी वणी, अब्दुल कलीम उर्फ बबलूभाई शेख कासम (52) शास्त्रीनगर वणी, सुनील शामराव काळे (42) गणेशपूर तसेच ट्रक चालक रामविलास रामलखन भारद्वाज, घुग्गुस, अमरनाथ गयाप्रसाद निषाद, बेलोरा चेकपोस्ट, मुकेशकुमार गणेश चौधरी, बेलोरा चेकपोस्ट शिरपूर यांचा समावेश आहे. तर
इतर दोन आरोपीना अटक करणे बाकी आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून ट्रक क्र.( MH34 AB 5475) (MH34 AB 3174) व ( MH34 AV O992) किंमत 30 लाख व त्यामध्ये भरलेले 3 लाख 77 हजार 300 रुपये किमतीचा 75.76 मे.टन कोळसा असे एकूण 33 लाख 77 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे । आरोपी विरुद्द कलम 379, 407, 411 व 34 भादवी अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

बाजारपेठ सुरू ठेवण्यास 2 तासांचा आणखी अवधी द्या

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हुंड्यासाठी छळ

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.