बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील आमलोन येय़े एका 50 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटेच्या वेळी ही घटना उघडकीस आली. आनंदराव शंकर मेश्राम रा. आमलोन असे आत्महत्या करणा-या इसमाचे नाव आहे. ते आमलोन येथे त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या 20 वर्षीय मुलासह राहायचे. त्यांची अडेगाव व कुंभारखणी येथे शेती आहे. शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारच्या मध्यरात्री म्हणजे मंगळवारी दिनांक 19 डिसेंबर रोजी मध्यरात्री त्यांनी गळफास घेतल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना कळले. त्यांनी तातडीने याची माहिती मुकुटबन पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. आनंदराव यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. त्यांच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. आनंदराव यांची सुस्वभावी व्यक्ती म्हणून परिसरात ओळख होती. त्यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Comments are closed.