रमाबाई वसतीगृहातील माजी विद्यार्थीनींचा ‘उत्सव मैत्रीचा’ सोहळा

तब्बल 38 वर्षांनी पुन्हा एकत्र आल्या मैत्रिणी

10

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील पूर्वी टिळक चौक परिसरात असलेल्या रमाबाई वसतीगृहातील सन 1982-84 या बॅचच्या विद्यार्थीनींद्वारा उत्सव मैत्रीचा हा कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील एस बी लॉन येथे हा स्नेहमीलनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी शिकणा-या सर्व विद्यार्थीनी आज 58 ते 60 वर्षांच्या आहेत. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात माजी विद्यार्थीनींनी सहभाग घेतला. रमाबाई हॉस्टेल असल्यामुळे शिक्षण घेता आले असे मनोगत यावेळी विद्यार्थीनींनी व्यक्त केले. दरम्यान सर्व विदयार्थींनींनी होस्टेलला भेट दिली. मात्र सध्या तिथे केवळ पिलर उभे असल्याने सर्व मैत्रिणी भावून झाल्या होत्या. कार्यक्रमाचे आयोजन स्नेहलता वैरागडे, यवतमाळ यांनी केले. कार्यक्रमाला सुमन सोनेकर, सुमित्रा सोनेकर, शोभा पाटील, छाया तितरे, मधुबाला लभाने,आदिमाया लभाणे, रेखा धोपटे, मीना वानखेडे, प्रमिला वाळके, कल्पना गांजरे, ज्योती गांजरे, प्रमिला भगत, विमल तेलतुंबडे, इंदिरा कवाडे, सुजाता ढेंगळे, जीजा काळे, गीता रामटेके, वंदना कावडे, संगिता डांगे, त्रिषला कवाडे, दमयंती फुलझेले इत्यादींची उपस्थिती होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.