वणीत चालत्या वाहनाने घेतला पेट

पेट्रोल पंपावरील कर्मचा-यांमुळे टळला अनर्थ

0 765

विवेक तोटेवार, वणी: वणीतील तलसील कार्यालयासमोर पेट्रोल पजवळ आज बुधवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास एका मारोती व्हॅन वाहनाने जागीच पेट घेतल्याची घटना घडली. यात गाडीचे नुकसान झाले असले तरी पेट्रोल पंपावरील काम करणाऱ्यांनी जागरुकता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला.

बुधवरी दुपारी 12 वाजता जावेद खान हाजी यांच्या मालकिची मारोती व्हॅन गाडी क्रमांक एम एच 04 ए एच 6224 ही लाठीवाला पेट्रोल पपंजवळ उभी होती. काही वेळात गाडीच्या समोरच्या भागाने अचनाक पेट घेतला. गाडी पेटताना बघून पेट्रोल पंपावर काम करणाऱ्यांनी त्वरित अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने आग विझवली.

यात जीवित हानी झाली नाही. मात्र गाडीच्या समोरच्या सीट जळल्या आहे. गाडीच्या वायरिंगमध्ये स्पार्किंग झाल्याने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.