महिलांच्या भांडणावरून वाद, इसमावर चाकूने हल्ला

0 886

विवेक तोटेवार, वणी: मंगळवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास वणीत एक इसमावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. सदर इसम हा शास्त्रीनगर भागात राहतो. घरातील महिलांच्या भांडणावरून हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे.

वणीतील शास्त्रीनगर भागात राहणारे मिनाज सैय्यद व अनिल गुलाब लोहकरे हे एकमेकांच्या शेजारी राहतात. मिनाज हा वाहन चालक आहे. मंगळवारी दुपारी अनिल व मिनाज यांच्या पत्नीचे काही कारणावरून भांडण झाले. भांडण इतक्या विकोपाला गेले की, मिनाज हा हातात दांडा घेऊन अनिल यास मारण्यास आला. आपल्या वडिलांना मारहाण होण्याची शक्यता दिसल्याने अनिलचा मुलगा आजम हा मध्ये आला.

आजमने त्याच्या हातातील चाकूने मिनाजच्या पोटावर वर केला. ज्यामध्ये मिनजच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. सुरवातीला मिनजला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु परिस्थिती गंभीर असल्याने मिनाजला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले.

या घटनेत आरोपी अनिल गुलाबराव लोहकरे (44) व आजम अनिल लोहकरे (21) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कलम 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडे शस्त्र सापडल्याने कलम वाढण्याची शक्यता आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीवरून या अगोदरही पोलिसात भांडणाची तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी कारवाई केली. परंतु आठ दिवसात पुन्हा ही घटना घडली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.