शालिनी गंगशेट्टीवार सार्वजनिक महिला समाजाच्या अध्यक्षपदी

24

जितेंद्र कोठारी, वणी: सार्वजनिक महिला समाजाची २०२३ – २०२४ साठीचा कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात सर्वानुमते शालिनी चं. गंगशेट्टीवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष भावना गंगमवार, सचिव स्वप्ना पावडे, सहसचिव – माधुरी कोंडावार, कोषाध्यक्ष- स्नेहलता चुंबळे यांची निवड करण्यात आली. सल्लागार म्हणून निलीमा काळे, भारती कोलप्याकवार, कीर्ती कोंडावार, शुभांगी सुरावार, विणा खोब्रागडे यांची निवड करण्यात आली. तर आमंत्रित सदस्य म्हणून अपेक्षा गादेवार, माया गौरकार, छाया उपलेंचवार, कविता सुरावार यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणी निवड सभेच्या अध्यक्ष निलीमा काळे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सा.म. समाजाच्या माजी अध्यक्ष व आमंत्रित सदस्य कविता सुरावार होत्या. 

मनोगत व्यक्त करताना शालिनी गंगशेट्टीवार म्हणाल्या की वटवृक्षाप्रमाणेच सार्वजनिक महिला समाजाची उन्नतीसाठी कायम प्रयत्नशील असणार. समाजाच्या, महिलांच्या कल्याणासाठी नवनविन उपक्रम राबवण्यात येईल अशी द्वाही दिली. 

नविन कार्यकारिणी मध्ये सुजाता ताटेवार, निलीमा सुरावार, अमिता गंजीवार, चित्रा गंगशेट्टीवार, प्रिती ताटेवार, शुभदा मुत्यलवार, सारिका येरावार, मृदुला झिलपीलवार, राजश्री पांडे, सोनल पांपट्टीवार, रजनी हिकरे, आशा चिद्दरवार, ज्योती कोंडावार. यांची निवड करण्यात आली.

यावेळी संस्थेचे कार्य आणि इतिहास याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमानंतर वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार भावना गंगमवार यांनी मानले. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.