भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रविवारी वणीत

15

जितेंद्र कोठारी, वणी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा रविवार 20 ऑगस्ट रोजी वणी येथे आगमन होत आहे. लोकसभा निवडणुक 2024 साठी भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या लोकसभा प्रवास योजने अंतर्गत राज्यव्यापी लोकसभा प्रवासाचा शुभारंभ 20 ऑगस्ट पासून चंद्रपूर येथून करणार आहेत. त्यांच्या एक दिवसीय प्रवासात ते चंद्रपूर लोकसभेतील सर्व 6 विधानसभांचा आढावा घेतील व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.

चंद्रशेखर बावनकुळे तूकुम परीसतील दिवाकर प्रिंटिंग प्रेसपासून कार्यालयापर्यंत ‘संपर्क से समर्थन’ अभियानाने दौऱ्याचा प्रारंभ करतील. ते दुपारी 1 वा. बुरूडकर सभागृहात वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर व राजुरा या विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत मार्गदर्शन करतील. दुपारी 4.30 वाजता वणी शहरातील शिवाजी चौक परिसरात पक्षप्रवेश कार्यक्रमात उपस्थित राहतील. सायंकाळी 5 वाजता टिळक चौकात घर चलो अभियानात सहभागी होतील.

सायंकाळी 5.30 वा ते वणी व आर्णी विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी बावनकुळे चर्चा करतील. यासोबतच ते या प्रवासात काही महत्वाच्या व्यक्तीं व व्यापारी मंडळ सोबत भेटी घेणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष यांचे प्रवासाचे नियोजन व तयारी स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्ष, लोकसभा संयोजक, लोकसभा निवडणूक प्रमुख, विधानसभा निवडणूक प्रमुख व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते करणार आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.