झोला येथे वर्धा नदीपात्रात सापडला अनोळखी इसमाचा मृतदेह

मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

7

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील झोला येथे वर्धा नदीपात्रात 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान एका 42 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती झोला सरपंचांनी पोलीस पाटील विठ्ठल पद्माकर डाखरे यांना दिली. त्यांनी वणी पोलिसांनी याबाबत कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.