वणीतील विद्यानगरीत जुगार अड्यावर धाड

13 जणांना अटक, मध्यरात्री डीबी पथकाची कारवाई

0 2,662

विवेक तोटेवार, वणी: गुरूवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास शहरातील विद्यानगरी येथील आर आर ढाबा या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली. ज्यामध्ये 13 जुवाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 3 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी खब-यांकडून महिती मिळाली की विद्यानगरी येथील आर आर ढाबा येथे काही इसम जुगार खेळत आहे. डी बी प्रमुख गोपाल जाधव यांनी आपल्या सहका-यांना घेऊन घटनास्थळी रवाना झाले. धाब्याच्या मागच्या टिनाच्या शेडमध्ये काही इसम पत्त्याचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. त्यांनी लगचे त्या ठिकाणी धाड टाकून 13 जुवा-यांना अटक केली.

प्रातिनिधिक फोटो

अटक करण्यात आली यात राहुल केशवरावजी नागतुरे (32) काजीपुरा, शुभम शंकर टेकाम (24), किसन पेटकर (27), विजय रामकृष्ण बोधने (32), अमोल विजय ठाकरे (26), विठ्ठल किसन कष्टी (39), निखिल गणेश धारने (28), गौरव मधुकर टोंगे (25), दिनेश शेषराव बदखल (35), प्रतीक राजेश्वर चिडे (22), अविनाश विठ्ठलराव सोनूले (25), अक्षय राजेंद्र दंडाज (22), मंगेश रामजी वैद्य (30) यांचा समावेश आहे.

आरोपींवर कलम 269,188, 4 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख पीएसआय गोपाल जाधव, सुदर्शन विनोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, दीपक वाड्रसवार, पंकज उंबरकर यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.