पिंपरी येथे शिवसेना प्रणीत पॅनलचा विजय

बहुमताने सर्व उमेदवार विजयी

0 13

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील पिंपरी (कायर) येथील शिवसेना प्रणीत जगन्नाथ बाबा ग्रामविकास पॅनलचा विजय झाला. सात पैकी सातही जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांवर मात करून मोठ्या फरकाने विजय प्राप्त केला. सदस्य म्हणून तात्याजी पावडे, राजू मोहारे, मनीषा गोंडे, गणेश मेश्राम, आशा ढवस, शुभांगी आस्वले,  करिष्मा सोयाम यांची निवड झाली.

यशासाठी उल्हास देठे, सुरेश देठे, अरुण ढवस, प्रभाकर देठे, अमोल आस्वले, शंकर पावडे, दिनेश पावडे यांच्यासह शिवसैनिकांनी परिश्रम घेतले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास नांदेकर यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

परमडोह येथे शिवसेना प्रणीत पॅनलचा विजय

शिंदोला लगतच्या परमडोह येथे संदीप थेरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात आली. यात शिवसेना प्रणीत शिव ग्रामविकास पॅनलचे पाच उमेदवार निवडून आले. सदस्य म्हणून सुनीता थेरे, मधुकर वाभीटकर, सोमेश्वर टेकाम, वंदना राजूरकर, मीना काकडे हे विजयी झाले.

हे देखील वाचा:

मृतकाच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, दवाखान्याची तोडफोड

झरी तालुक्यात दिग्गजांना हादरा, मतदारांची परिवर्तनाला पसंती

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.