कापूस वेचायला मजूर घेऊन जाणारा ऑटो पलटी

एक महिला ठार, सहा जण जखमी

0 996

वणी (रवी ढुमणे): वणी घोंसा मार्गावरील कोरंबी मारेगाव जवळ कापूस वेचायला मजूर घेऊन जाणाऱ्या आटोला अपघात झाल्याने एक महिला जागीच ठार तर सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतक महिलेचं नाव विमल सुधाकर धानोरकर राहणार रामपुरा वार्ड वणी आहे, तर एका मुलाच्या पायाचा पंजा तुटून पडला आहे.

अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. सोबतच वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे व डीबी पथक सुद्धा घटनास्थळी रवाना झाले आहे.

सदर अपघात मारेगाव रासा गावाच्या घडला आहे. MH34AB3012 या पीक अपने ऑटोला धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर पिक अपचालक पसार झाल्याची माहिती आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.