आकाश सुर यांनी केला दिव्यांगांसोबत वाढदिवस साजरा

0 734

बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीचे वणी तालुका अध्यक्ष आकाश सुर यांनी दिव्यांगांसोबत वाढदिवस साजरा केला. १६ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी २ वाजता वणीतील अपंग निवासी कर्मशाळा येथे त्यांनी वाढदिवस साजरा केला. यावेळी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

आकाश सुर हे सलग चार वर्षांपासून त्यांचा वाढदिवस दिव्यांग विद्याथ्यांसोबत साजरा करीत आहे. यावर्षीही त्यांनी ही परंपरा सुरू ठेवली. यावेळी रोजच्या आयुष्यातील संकटावर विजय मिळवत आपले आयुष्य जगणाऱ्या धाडसी दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला. या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करतांना आकाश सुर यांनी “रोज आपल्या आयुष्यात संकटाचा सामना करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्याकडूनच आपल्याला आयुष्यात सामोरी येणाऱ्या संकटाचा सामना करण्याची प्रेरणा मिळते” असे मत व्यक्त केले.

शााळेेतील विद्यार्थ्यांसह सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते

यावेळी शाळेतील शिक्षक संतोष किंगरे, अजय धोबे, प्रवीण खानझोडे, मंगेश रासेकर, अमोल टोंगे, राजु पिंपळकर, आशिष आगबत्तलवार, सृजन गौरकर, राहुल खारकर, विकास देवतळे, अजय विधाते, रवीचंद्र मत्ते, केतन ठाकरे, तुषार ठाकरे, धीरज भोयर, सूरज कांबळे, गोपाल ढवस, रितेश लाडे, मुक्तानंद भोंगळे, मंगेश झाडे, प्रफुल्ल भोयर, महेश खाडे, चंदू मत्ते, हनुमान डंभारे, प्रफुल वानखेडे, आकाश मडावी इ. जण उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.