अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक गंभीर 

मुंगोलीजवळ झाला अपघात

0 1,063
रवि ढुमणे, वणी : शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मुंगोली नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी 7.30 चे सुमारास घडली आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तालुक्यातील कैलासनगर या वेकोली वसाहती मध्ये राहणारे   गोपी धनराज दिंडी गाला वय 23, नरेश सुंदरगिरी चंद्रया वय 46 हे दोघे दुचाकी क्रमांक MH 34 BJ 8253 ने घराकडे परत जात असताना घुघुस कडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.  या धडकेत गोपी जागीच ठार झाला तर नरेश गंभीर जखमी झाला. नरेशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र वाहन घटनास्थळावरून पसार झाले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.