कॉलेज विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने खळबळ

गौराळा येथे युवकाची आत्महत्या

10

भास्कर राऊत, मारेगाव: घरी कोणी नसतांना एका 12 वी मध्ये शिकणाऱ्या कॉलेजवयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील गौराळा येथे घडली. युवराज मधुकर धोबे वय 17 वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव असून तो संकेत कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव येथे 12 वी मध्ये शिक्षण घेत होता.

आज दि. 18 नोव्हेंबरला दुपारचे वेळेस युवराज याचे घरची मंडळी मारेगाव येथे दवाखान्यात गेलेली होती. घरी कोणीच नाही हे पाहून युवराज याने घरीच पंख्याला साडी बांधून स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. दुपारी 1.30 चे दरम्यान ही घटना उघडकीस आली. अभ्यासामध्ये हुशार असलेला, मनमिळाऊ स्वभावाच्या युवराज याच्या अचानक जाण्याने तर्कवितर्क काढले जात आहे.

नेहमी कॉलेज आणि घर. तसेच आपला अभ्यास आणि घरची कामे याव्यतिरिक्त बाहेर जास्त न फिरणाऱ्या युवराजच्या अकाली एक्झिटने गावावर शोककळा पसरली आहे. युवराजने नेमकी आत्महत्या कशामुळे केली याचे नेमके कारण कळू शकले नाही.

मारेगाव पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन मृताचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृत्यूच्या कारणांचा तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.