घोगुलधरा येथील तरुणीची आत्महत्या

तरुणीच्या आत्महत्येने गावात शोककळा

0 395

जयप्रकाश वनकर, बोटोनी: बोटोनी येथून तीन कि.मी अंतरावर असलेल्या घोगुलधरा येथील एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली. ऐन दिवाळीच्या तोंडावर आत्महत्या केल्याने गावात मोठया प्रमाणात शोककळा पसरली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव गीता केशव रामपुरे (17) असून ती मानसिक आजाराने गेल्या अनेक वर्षापासून ग्रासलेली होती.

गीता बुधवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास प्रात: विधीकरिता गावाच्या बाजूला असलेल्या १ कि.मी. अंतरावरील दिलीप खंडाळकर यांचे शेताकडे गेली होती. बराच वेळ होऊनही ती परत आली नसल्याने, घराची मंडळी व शेजारील आप्त मंडळी गीता च्या शोधात निघाले. गीताच्या हातात असलेला प्रात: विधीस नेलेले डब्बा दिलीप खंडाळकर यांचे शेतातील विहिरीच्या बाजूने दिसून आला. अशा अंदाजाने विहिरीत शोध घेतला असता तिथे गीताचे प्रेत आढळून आले.

पोलीस प्रशासनाच्या मदतीने गीताचे प्रेत विहिरीतून बाहेर काढण्यात आले व या घटनेची माहिती तात्काळ पोलीस स्टेशन मारेगाव यांना भ्रमण ध्वनी वरून देण्यात आली. माहिती मिळतास मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री राऊत आपला ताफा घेऊन घटना स्थळी दाखल झाले व प्रेत शव विछेधनासाठी मारेगाव रूग्णालयातल्यात हलवण्यात आले.

गीताचे वडील बोर्डा येथे सालदार म्हणून कामास बाहेर गावी राहत असून एक बहिण व दोन भाऊ घोगुलधरा येथे राहतात. सदर घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.