नवरात्रीनिमित्त नवीन किंवा जुनी साडी दान करण्याचे आवाहन

स्माईल फाउंडेशनचा उपक्रम, अधिकाधिक लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन

33

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नवरात्रीनिमित्त गरजू व गरीब महिलांना साडी दान करण्याचा उपक्रम राबवला जात आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही स्माईल फाउंडेशन हा उपक्रम राबवत आहे. अनेक महिलांकडे साड्यांचा मोठा स्टॉक असतो. मात्र तो वापरणीत नसतो. अशा चांगल्या कंडिशनमधल्या साडी तसेच ज्या महिलांकडे जुन्या साड्या नाही मात्र त्यांना नवीन साडी दान करण्याची इच्छा आहे अशा महिलांकडून नवीन साड्या घेऊन त्या गरजू व गरीब महिलांना दान करण्यात येणार आहे. या नवीन व जुन्या साडी स्माईल फाउंडेशनतर्फे गरजू व गरीब महिलांपर्यंत पोहोचत्या केल्या जाणार आहे. तसेच ज्यांना साडी ऐवजी देणगी देण्याची इच्छा असेल, त्यांच्याकडून देणगी स्वरुपात रोख रक्कम घेऊन त्यातून नवीन साडी खरेदी केली जाणार आहे. या उपक्रमात महिला व पुरुषांनी सहभागी होऊन गरीब व गरजू महिलांना मदत करावी असे आवाहन स्माईल फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तसेच नवीन व जुन्या साड्या व देणगी देण्याकरिता अधिक माहिती करीता सागर जाधव 7038204209, तन्मय कापसे 7517808753, आदर्श दाढे 8484031777, अनिकेत वासरीकर 91468 83379 यांच्याशी संपर्क साधावा अशी आवाहन स्माईल फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे. स्माईल फाउंडेशन ही वणीतील एक सुपरिचित संस्था असून या संस्थेद्वारा शहर व परिसरात गेल्या तीन वर्षांपासून विविध सामाजिक, सास्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण पूरक उपक्रम राबवले जाते. स्माईल फाउंडेशनच्या कार्याची दखल घेऊन या संस्थेला विविध पुरस्कार देखील प्राप्त झाले आहे. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.