वकील अमोल उर्फ विजय कुरेकर यांची आत्महत्या

दुपारी कोर्टातून घरी येऊन घेतला गळफास

0 2,831

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरातील दिवाणी न्यायालयात वकिली करणा-या ऍड अमोल उर्फ विजय कुरेकर (३६) यांनी प्रगती नगर येथील आपल्या राहत्या घरी बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप कळले नसले तरी त्यांच्या आत्महत्येने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अमोल उर्फ विजय कुरेकर हे सकाळी कोर्टात गेले होते. कोर्टात काही वेळ थांबल्यानंतर ते दुपारी घरी परतले. दुपारी तीन वाजताच्या दरम्यान ते घरातील बेडरुम मध्ये गेले व तिथे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केल्याचे कळताच त्यांचा भााचा आशुतोष घुघुल व त्यांचे वडिलांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

विजय यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व आत्प परिवार आहे. एक तरुण वकिलाने अचानक आत्महत्येचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. घटनेचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.