22 जुलैला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

धनोजे कुणबी समाज विकास संस्थेद्वारा आयोजन

0 569

गिरीश कुबडे, वणी: वणीतील धनोजे कुणबी समाज भवन येथे 22 जुलै रविवारला समाजातील 10वी, 12वी तील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित कऱण्यात आला आहे. धनोजे कुणबी समाज विकास बहुउद्देशीय संस्थेद्वारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकाद्वारे करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यासह शिक्षण, कला, कृषी, उदयोग, खेळ व सामाजिक क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपले नाव उंचवाणा-या समाजातील व्यक्तींचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूरवरून व्याख्याता, वृत्तनिवेदक, अध्यापक तात्यासाहेब रामचंद्र मोरे हे येणार आहे.

या सत्कार सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जगदीश ढोके- 9850366310, विकास जेनेकर- 9822450720, डॉ.जगन जुनगरी- 8888331616, विकास देवतळे- 9637452011 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन धनोजे कुणबी समाज विकास बहुउद्देशीय संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ….

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.