दीप्ती टॉकीजचे संचालक दीपक ठाकूरवार यांचे निधन

आज दुपारी 3 वाजता निघणार अंत्ययात्रा

19

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील दीप्ती टॉकीजचे संचालक व व्यावसायिक दीपक ठाकूरवार यांचे आज सोमवारी दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. सकाळी त्यांना हृदयविकाराच्या धक्का आला. मात्र त्यांना रुग्णालयात नेण्याच्या आधीच घरी त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी 3 वाजता त्यांचे राहते घर दीप्ती टॉकीज येथून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्यावर स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, 1 मुलगी, भाऊ, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. शहरात असलेली दीपक टॉकीज ही त्यांच्याच नावाने सुरू करण्यात आली होती. मात्र अलिकडच्या काळात ती बंद करून त्यांनी जत्रा रोड परिसरात दीप्ती टॉकीज नावाने थिएटर सुरू केले होते. टॉकीज क्षेत्रातील एक मोठे आणि सुपरिचित नाव म्हणून त्यांची ओळख होती. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा वावर असायचा. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.