संताजी स्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व निरोप समारंभ

56

विवेक तोटेवार, वणी: संताजी इंग्लिश मिडीयम स्कूलचा 2022- 23 मध्ये माध्यमिक शालांत परीक्षेचा 100% निकाल लागला. या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व निरोप समारंभ कार्यक्रम शनिवार 17 जून रोजी शाळेतील सभागृहात घेण्यात आला. विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाकडून पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. शिवाय त्यांच्या भावी आयुषबाबत शुभेच्छा देण्यात आल्या.

शहरातील सर्वोदय चौक स्थित श्री संताजी ज्ञान प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित संताजी इंग्लिश मिडीयम स्कूलचा माध्यमिक शालांत परीक्षेचा 100% निकाल लागला. परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव व निरोप समारंभ कार्यक्रम शनिवार 17 जून रोजी शाळेतील सभागृहात घेण्यात आला. कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष रमेश येरने, उपाध्यक्ष ओमप्रकाश निमकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुरेकर, सूत्रसंचालन दीकुंडवार तर उपस्थितांचे आभार निशात शेख यांनी मानले.

कार्यक्रमात सचिव धनंजय आंबटकर, सहसचिव तानाजी पाऊनकर तसेच संचालक संजय पोटदुखे, मुख्यधिपिका सीमा कुरेकार, शोभा गंधारे, विवेक बुटले, खुशाल कातोरे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.