दुभाजकावर आदळली दुचाकी, एक ठार एक गंभीर

लालपुलिया येथील घटना

15

जितेंद्र कोठारी, वणी: अनियंत्रित दुचाकी दुभाजकावर आदळून दुचाकीचालकाचा मृत्यू झाला तर, अन्य एक गंभीर जखमी झाला. ही घटना आज सायंकाळी 3.30 वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ मार्गावर लालपुलिया परिसरात घडली. अजय मुकिंदा आत्राम (29) रा.पलसोनी असे मृतकाचे तर विशाल श्रावण बेलेकार जखमीचे नाव आहे.

तालुक्यातील पलसोनी येथील दोघ मित्र होंडा शाईन या दुचाकीने वणीवरुन गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान लालपुलिया परिसरात पोहचतात चालकाचा मोटारसायकल वरुन ताबा सुटला आणि भरधाव मोटारसायकल डिव्हायडरवर आदळली. या घटनेत दाेघांनाही गंभीर दुखापत झाली. मात्र, अजयचा काही वेळात घटनास्थळीच मृत्यू झाला.

माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून विशालला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले, तर अजय आत्रामचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी वणी पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे. सणासुदीच्या दिवशी घडलेल्या या दुःखद घटनेमुळे पलसोनी गावात शोककळा पसरली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.