हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या इसमास अटक

0 1,692

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी 17 मार्चला रात्री हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या इसमास वणी पोलिसांनी पेट्रोलिंग करीत असताना अटक केली. त्याच्याजवळील हत्यार जप्त करून आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

वणी जवळ असलेल्या गोकुलनगर परिसरात राहणार बाबलुसिंग रामसिंग टाक 25 हा शनिवारी रात्रीच्या सुमारास हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालीत असल्याची खबर वणी पोलिसांना मिळाली. वणीचे ठाणेदार वैभव जाधव यांनी त्वरित पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी लगेच आरोपीला अटक केली. व त्याच्या हातातील हत्यार जप्त केले.

बाबलुसिंग याच्यावर आर्म्स ऍक्ट 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास ठाणेदाराच्या मार्गदर्शनात जगदीश बोरणारे करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.