एकता नगर येथे मटका अड्ड्यावर धाड

● दोन मटका व्यावसायिकांना अटक

0 13

जितेंद्र कोठारी, वणी: एकता नगर भागात मटका पट्टी व्यवसाय सुरु असल्याची गुप्त माहिती वरून वणी पोलिसांनी रविवारी दोन ठिकाणी धाड टाकून 2 मटका पट्टी चालविणाऱ्याला अटक केली.

      

पोलिसांनी रविवारी दुपारी 3.30 वाजता दरम्यान एकता नगरमधील शाळा क्र. 2 चे मागे मटका सट्टापट्टीचे आकडे लिहून देताना किशोर सहदेव खोब्रागडे (41) रा. राजूर कॉलरी ता.वणी यास अटक केली. आरोपीकडून वरली मटका साहित्य व रोख 1130 रुपये जप्त करण्यात आले.

दुसऱ्या घटनेत एकता नगर भागातच आरोपी हरिदास मारोती मडावी (60) रा. राजूर कॉलरी ता.वणी याला मटका पट्या लिहिताना अटक करण्यात आले. हरिदास जवळून रोख 1560 रुपये व मटका पट्टी, पेन ई. साहित्य जप्त केले. दोन्ही आरोपी विरुद्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

क्रिकेट सट्टा-मटका धाड प्रकरणी आरोपींचा पाय खोलातच

बर्ड फ्लू आजाराची ग्रामीण जनतेत धास्ती

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.