विधवा महिलेचे लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण

संबंधातून पीडिता गर्भवती, आरोपीचा लग्नास नकार

14

सुरेश पाचभाई, बोटोणी: लग्नाचे आमिष दाखवून एका विधवा महिलेशी शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणा-या एका मजनुच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पीडिता ही 7 गर्भवती असल्याची माहिती आहे. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर वृत्त असे की पीडिता ही 37 वर्षीय तिच्या पतीचे 10 वर्षांआधी निधन झाले आहे. पीडित महिला ही तालुक्यातील एका गावात तिच्या एका मुलासह राहते. आरोपी प्रताप गजानन जिवतोडे (27) हा घोडदरा येथील रहिवाशी आहे. त्याची पीडितेशी ओळख होती. पीडिता शेतात गेली की आरोपी तिचा पाठलाग करायचा. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. पीडित महिला एकटीच राहत असल्याने आरोपीने तिच्याशी सलगी वाढवली. पाच वर्षांपूर्वी त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले. 

काही दिवसांनी आरोपीचे पीडितेच्या घरी ये-जा वाढली. दरम्यान आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. काही महिन्याआधी पीडिता ही गर्भवती राहिली. पीडिताने दवाखान्यात जाऊन तपासणी केली असता डॉक्टारांनी तिला 7 महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. दिवसेंदिवस पोटात गर्भ वाढत असल्याने तिने आरोपीकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र आरोपीने लग्नास नकार दिला.

प्रियकराकडून मिळालेल्या धोक्यामुळे पीडितेने मारेगाव पोलीस स्टेशन गाठत आरोपी प्रताप गजाजन जिवतोडे (27) विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरोधात भादंविच्या कलम 379, 376 (2) (N), 417, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

क्रुझरची दुचाकीला भीषण धडक, दुचाकीचालक ठार

विवाहितेला फेसबुकवर झाला प्यार… मुलगीही झाली, मात्र प्रियकराचा इन्कार

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.