बस आणि ओमनीची धडक, एक जागीच ठार, एक जखमी

सुशगंगा पॉलिटेकनिकजवळ झाला अपघात

0 1,440

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास एसटी महामंडळाच्या परभणी-चंद्रपूर या बस आणि मारुती ओमनीला अपघात झाला. वणी वरोरा रोडवरील सुशगंगा पॉलीटेकनिक जवळ हा अपघात झाला. यात एक जण जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की महामंडळाची क्रमांक एम एच 20 बी एल 2312 ही बस परभणी वरून चंद्रपूरला निघाली होती. वणीवरून चंद्रपूर येथे जात असताना वरोरा मार्गावरून येणारी मारुती ओमनी क्रमांक एम एच 34 के 2355 या गाडीने धडक दिली. चारचाकी गाडीमध्ये यावेळी मोहमद मोबिन अन्सारी (35) राहणार वरोरा व चालक मोहमद कलाम (28) राहणार वरोरा हे दोघे होते. या अपघातामध्ये चालक मोहमद कलाम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघात झाला त्यावेळी बसमध्ये सुमारे 80 प्रवासी होते परंतु कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. घटनास्थळी काही प्रवाशांनी येऊन जखमीस रुग्णवाहिकेमध्ये बसवून वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बसचे चालक देशमुख व वाहक एम के सोनटक्के यांनी अपघातग्रस्त बसला पोलीस स्टेशन वणी येथे आणले आहे. वृत्त लिहतपर्यंत वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.