बोरगाव येथे पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा

0 489

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील बोरगाव (मेंढोली) येथील पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा दि. १६ मंगळवारी रात्री पार पडला. आमदार विकास निधी अंतर्गत सदर काम पूर्ण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर होते. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचे उद्दघाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य परसराम पेंदोर, दिनकर पावडे, पंचायत समिती सदस्य वर्षा पोतराजे, राजेश गायनार, के. एम. मानकर, दीपक पवार, अनिल ढेंगळे, अरुण ताजने, वासुदेव आवारी, देविदास काळे, पोलीस पाटील प्रदीप बलकी, डॉ. पुंडलिक भोंगळे उपस्थित होते.

यावेळी गुणवंत विध्यार्थी लुकेश कोल्हे, हरीश भोंगळे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आमदार बोदकुरवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेत डिजिटल खोलीचे उद्दघाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन सरपंच भारत गेडाम, उपसरपंच श्रीकृष्ण महाकुलकर, ग्रामसेवक एम. डब्ल्यू. कोराम, पद्माकर देरकर, गीता ताजने, मनीषा गेडाम, माया गौरकार, दिशा पहुरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसंता सातपुते, उपाध्यक्ष सुधाकर धांडे यांनी केले. संचालन दत्तू महाकुलकर यांनी केले. आभार सुधाकर तुराणकार यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.