झरी तालुक्यातील वयोवृद्धांना शाल व स्टील काठीचे वाटप

सेवासप्ताहांतर्गत झरी भाजपाचा उपक्रम

0 11

सुशील ओझा, झरी: देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रम भाजपा मंडळ झरी तालुक्याने घेतला.
दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता झरी येथे वणी विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात तालुक्यातील वयोवृद्धांना शाल व स्टील काठ्या देण्यात आल्यात.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा वणी पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे, भाजपा झरी तालुका अध्यक्ष सतीश नाकले, पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार, झरी नगरपंचायतचे नगराध्यक्ष राजू मोहीतकर, माजी पं.स सदस्य सुरेश मानकर, पं. स. उपसभापती लता आत्राम, झरी भाजपा महिला आघाडी अध्यक्षा प्रिया भोयर, झरी न.पं. नगरसेविका शांताबाई जिवतोडे,

भाजपा माजी तालुकाध्यक्ष अनिल पोटे, मा.कृ. उ.बा.स.सभापती अनिल पावडे, भाजपा जिल्हा सचिव संजय दातारकर, वणी सुतगिरणीचे संचालक अनिल विधाते, न. पं. नगरसेवक अंकुश लेंढे, विपीन ऐनवार, सचिन दुम्मनवार, कुश केमेकर, राकेश पडलवार, प्रवीण नोमुलवार, प्रवीण चुक्कलवार, धनपाल सिडाम, सुधीर पांडे, विनोद भोंग, मुरलीधर वैद्य तसेच झरी जामणी तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.