अनेक वादानंतर माळी पुऱ्यातील फलक लावला:

सावित्रीबाई फुले व ज्योतिबा यांचा काढला होता फलक

0 16

विवेक तोटेवार, वणी: 10 सप्टेंबर रोजी एका व्यावसायिकाने आपल्या दुकानासमोर येत असलेला फलक नगर परिषदेच्या सहमतीने हलविला होता. त्यामुळे माळीपुऱ्यातील अनेकांच्या सामाजिक भावना दुखावल्यात. याबाबत अनेक वाद झालेत. त्यानंतर सर्वसहमतीने महात्मा ज्योतिबा आणि क्रातज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फलक पुन्हा लावण्यात आला.

10 व 11 सप्टेंबर रोजी माळीपुऱ्यातील हा फलक काढण्यात आला. तेथील युवकांनी याचा विरोध केला. परंतु नगर परिषदेच्या परवानगीने काढण्यात आलेला फलक पुन्हा लावण्यात येणार नाही अशी भूमिका संबंधित व्यावसायिकाची होती. त्यांच्या म्हणण्यानुसार सदर फलक ह दुकानाच्या समोर येत होता. परंतु माळीपुऱ्यातील काही युवकांनी या प्रकरणी पुढाकार घेतला. मुख्याधिकारी यांच्या तोंडी सहमतीने फलक पुन्हा लावण्यात आला. फलक पूर्ववत लावण्यात आल्याने माळीपुऱ्यातील जनतेत आनंदाचे वातावरण आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.