शिक्षक निलेश सपाटे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव

नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल पुरस्कार देऊन सत्कार

0 566

विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यातील परामडोह येथील उपक्रमशील शिक्षक निलेश सपाटे यांनी मतदान यादीचे कार्य उत्कृष्टपणे केल्याबद्दल तहसिलदार वणी यांचे कडून सपाटे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

निलेश सपाटे हे शाळेत विद्यार्थ्यांसाठी नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल परामडोहचे उपसरपंच संदीप थेरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

(11वी विज्ञान प्रवेशाचा प्रश्न चिघळणार, आंदोलक करणार आंदोलन तीव्र )

वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, साक्षरता मोहीम अशा समाजोपयोगी कार्यात ते सातत्याने हिरिरीने सहभागी होतात. सपाटे यांच्या कार्याचं आणि त्यांना मिळालेल्या सन्मानाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.