राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल धुर्वे यांचे निधन

12

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस व चिखलगाव येथील रहिवासी असलेले स्वप्नील धुर्वे यांचे आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास निधन झाले. ते 35 वर्षांचे होते. आज सकाळी ते झोपेत निपचित पडून असल्याचे त्यांच्या घरच्यांना आढळून आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. स्वप्निल यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनसाठी पाठवण्यात आला आहे. स्वप्निल धुर्वे यांचा विविध सामाजिक आंदोलनात सहभाग असायचा. विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी त्यांनी लढा विद्यार्थ्यांच्या हक्काचा ही मोहीम राबवली होती. यासाठी त्यांनी उपोषणही केले होते. गेल्या आठवड्यात त्यांनी चिखलगाव, लालपुलिया परिसरातील प्रदूषणाचा मुद्दा उचलला होता. 14 मार्च रोजी याबाबत मोठे आंदोलनही स्वप्निल धुर्वे यांच्या नेतृत्त्वाव केले गेले होते. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.