संत रविदास सभागृहात सावित्रीबाई फुले व जिजाऊंना अभिवादन

चर्मकार समाजातर्फे जयंती साजरी

14

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शनिवारी दिनांक 15 जानेवारी रोजी वणीतील संत रविदास महाराज महाराज सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. चर्मकार युवा मंच वणीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नामदेवराव खोले, दौलत वाघमारे व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बांगडे यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र धुळे यांनी केले. यावेळी मोठ्या प्रमाणात संत रविदास महाराज चर्मकार युवा मंचचे सदस्य उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.