नांदेपेरा चौफुलीवर इंडिकाचा विचित्र अपघात

0 761

वणी (रवि ढुमणे): वणी शहरातून जाणाऱ्या नांदेपेरा मार्गावरील चौफुलीवर इंडिकाला रात्रीचे सुमारास विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणतीही हानी झाली हे अद्याप तर कळले नाही. वरोरा मार्गावरून वणीकडे येणारी इंडिका कार क्रमांक एम एच 29 आर 7238 सुसाट येत होती. दरम्यान चौफुलीवर असलेल्या गतिरोधकावर कार आदळली आणि चालकाचा ताबा सुटला. कार थेट चौफुलीवर असलेल्या चौकाच्या नामकरण फलकाला उडवून कार खड्यात गेली अन तेथून परत सुस्थितीत वळली.

सदर अपघात कसा घडला हे सुद्धा समजणे कठीण झाले आहे. या अपघातात कोणती हानी झाली कार कोणाची आहे असे प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच आहे. मात्र सदर कार ही जैन लेआऊट मधील असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे.. अपघात साधारणतः रात्रीच्या वेळी घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.