वसंतराव आबाजी गोरे यांचे अल्पशा आजाराने निधन

भास्कर गोरे यांना पितृशोक, उद्या स. 11 वाजता राहत्या घरून निघणार अंत्ययात्रा

37

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील महाराष्ट्र बँक जवळील परिसरात राहणारे वसंतराव आबाजी गोरे (79) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आज बुधवारी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी सुरुवातीला स्टॅम्प वेंडर म्हणून काही वर्षे काम केले. त्यानंतर चक्कीचा व्यवसाय सुरु केला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. 15 दिवसांआधी त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर एक आठवडा उपचार सुरु होता. त्यानंतर त्यांना वणी येथे आणण्यात आले. चार दिवसांपासून त्यांच्यावर घरीच आरोग्य सेवा सुरू होती. मात्र आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या गुरुवारी दिनांक 16 नोव्हेंबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून सकाळी ठिक 11 वाजता राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे. ते सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक भास्कर गोरे यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंड असा आप्त परिवार आहे.

वणी बहुगुणीकडून वसंतराव आबाजी गोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली… 💐💐

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.