आदर्श विद्यालयात बालक दिन साजरा

0 626

सुनील बोर्डे, वणी: वणी येथील आदर्श विद्यालयात भारताचे पहिले  पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती ‘बालक दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक सुरेश घोडमारे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षिका लता पाटणकर होत्या.

मान्यवरांच्या हस्ते नेहरूजींच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. याप्रसंगी विध्यार्थ्यांची नेहरू यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली. प्रभारी मुख्याध्यापक सुरेश घोडमारे, लता पाटणकर यांनी विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन प्रभारी शिक्षक विकास बलकी यांनी केले. संचालन वैष्णवी लाकडे हिने केले. आभार अजलफा कौसर अली हिने मानले. याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.