वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम स्थळात बदल

सर्व नियोजित कार्यक्रम होणार नगर वाचनालयात

0 396

बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील नगर वाचनालय वणी तर्फे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनानिमित्त सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे या कार्यक्रम स्थळात बदल करण्यात आला असून हा कार्यक्रम आता नगर वाचनालय इथे होणार आहे.

एस.पी.एम.विद्यालयातील विद्यार्थिनींच्या दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे तिथे दुपारी 1 ते 3 या वेळात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची वाचन स्पर्धा व पाठांतर स्पर्धा ही आता नगर वाचनालयात होणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता पांढरकवडा येथील गुरुकुल विद्यालयाचे प्राचार्य विजय देशपांडे यांचे ‘वाचन संस्कृती‘ या विषयावर व्याख्यान ही नगर वाचनालयात होणार आहे.

या सर्व कार्यक्रमांना वणीकर नागरिकांनी यात सहभागी व्हावे अशी विनंती नगर वाचनालयातर्फे करण्यात आली आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.